Akola News | 'सारथी'चे प्रशिक्षणार्थी पहिल्या कमाईतून माता-पित्यांसाठी कपडे घेणार

'सारथी'चे प्रशिक्षणार्थी पहिल्या कमाईतून माता-पित्यांसाठी कपडे घेणार
Sarthi News
'सारथी'चे प्रशिक्षणार्थी पहिल्या कमाईतून माता-पित्यांसाठी कपडे घेणारfile photo
Published on
Updated on

अकोला - ‘सारथी’च्या उपक्रमात प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी ‘शिकता शिकता कमवा’ योजनेद्वारे आपल्या पहिल्या कमाईतून माता-पित्यांना कपडे घेऊन देणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीदिनानिमित्त राज्यभरात हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आहे.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा कुणबी या लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करते.

समाजातील नॉन क्रिमिलेअर वर्गातील विद्यार्थ्यांना संगणकीय कौशल्य, इंग्रजी भाषा कौशल्य, संवाद कौशल्य विकासासाठी छत्रपती संभाजी महाराज युवा व्यक्तिमत्व व संगणक कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येतो. त्यात राज्यातील सुमारे ८४ हजार २९९ विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.

हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थी असल्याने त्यांच्याकडे लॅपटॉप, डेस्कटॉप उपलब्ध नसतो. त्यामुळे त्यांच्या सरावासाठी ‘सरसेनापती वीर बाजी पासलकर सारथी संगणक शिकता शिकता कमवा’ योजना सुरू करण्यात आली आहे. त्यात विविध योजनांचे ऑनलाईन फॉर्म भरून देणे, डीटीपी आदी कामांचा अनुभव व मोबदलाही मिळतो.

श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त गतवर्षी या योजनेत सहभागी ३ हजार ५५३ विद्यार्थ्यांनी पहिल्या कमाईतून आपल्या आईला साडी घेतली होती. पालकांप्रती असा कृतज्ञतापूर्वक उपक्रम यंदाही शिवजयंतीला दि. १९ फेब्रुवारी रोजी राबविण्यात येणार आहे. सध्या प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी आपल्या स्वकमाईतून आई-वडलांना कपडे घेऊन देणार आहेत. त्यानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमही होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news