अकोला, पुढारी वृत्तसेवा : अकोल्यामध्ये धावत्या बसला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली. गच्च प्रवासी असलेल्या रस्त्याने धावत असलेल्या शिवशाही बसमधून धुर निघत असल्याने बस थांबवून प्रवाशीयांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यानंतर नंतर शिवशाही बसने पेट घेतल्याची घटना अकोला शहरानजीक गुरुवारी (दि.25) दुपारी घडली. या घटनेत शिवशाही बस जळून खाक झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवशाही बस क्र एमएच 09 ईएम 1792 ही शेगावहून अकोल्याकडे येत होती. यावेळी अकोला शहरानजीक रिधोरा गावासमोर राष्ट्रीय महामार्गावर बसमधून धुर निघत असल्याने चालकाने बस रस्त्याच्या बाजूला उभी करून प्रवाशांना खाली उतरवले. यानंतर काही वेळात या शिवशाही बसने पेट घेतल्याने सर्वांमध्ये तारांबळ उडाली. यानंतर अग्नीशमन दलाला ही आग विझविण्यासाठी अकोला व बाळापूर येथून येथून बोलवण्यात आले. यानंतर बसला लागलेली आग अटोक्यात आणण्यासाठी अग्नीशमन दलाला यश आले. शिवशाही बसने पेट नेमका कशामुळे घेतला हे मात्र अधिकृतपणे कळू शकले नाही .मात्र या घटनेमागे शॉर्ट सर्कीट झाल्याचे कारण सांगितले जात आहे.