

अकोला : पश्चिम विदर्भातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी (9 नोव्हेंबर) अकोल्यात जाहीर सभा होणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मैदानावर होणार्या या सभेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या सभेची महायुतीतर्फे जय्यत तयारी सुरू आह़े केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार अमोल मिटकरी, आमदार संजय कुटे यांच्या नेतृत्वात विविध 227 समित्या गठित करण्यात आल्या आहेत.