Patient Death Akola| अकोल्यात खळबळ : रूग्णाने रुग्णालयात गळफास घेऊन जीवन संपविले

Akola News | सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
Akola Patient Death Hospital
रुग्णाने हॉस्पिटलच्या वॉर्डमध्येच गळफास घेऊन जीवन संपविले(Pudhari Photo)
Published on
Updated on

Akola Patient Death Hospital

अकोला : शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. उपचारासाठी दाखल असलेल्या एका रुग्णाने हॉस्पिटलच्या वॉर्डमध्येच गळफास घेऊन जीवन संपविल्याची माहिती समोर आली आहे. अमोल हरिचंद्र कावनपुरे (वय ३२, रा. पहाडीपुरा, बनोसा, ता. दर्यापूर, जि. अमरावती) असे मृत युवकाचे नाव आहे. तो पायाच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. ही घटना आज (दि.२३) घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, रुग्णाच्या रूमचा दरवाजा उघडत नसल्याचे नर्सच्या लक्षात आले. त्यानंतर रुग्णाचे नातेवाईक आणि हॉस्पिटल कर्मचारी यांनी दरवाजा तोडून उघडला असता, अमोल कावनपुरे यांनी दुपट्ट्याच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेतल्याचे आढळले.डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले.

Akola Patient Death Hospital
Akola Accident | अज्ञात वाहनाने कळपातील २० मेंढ्या चिरडल्या, २५ गंभीर जखमी

या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह अकोला शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news