अकोला : बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथील काटेपूर्णा धरणाचे शनिवारी संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास चार दरवाजे उघडण्यात आले . काटेपूर्णा नदीपात्रात पाणी सोडले आहे. नदी काठावरील गावांतील जनतेने सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
काटेपूर्णा धरणातील पाण्याची पातळी वाढत आहे. २४ ऑगस्टला धरणातील पाण्याची पातळी ९१.४७ टक्के एवढी होती. धरणाच्या चार दरवाजामधून ३५४२ क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. पाण्याची पातळी कमी जास्त होत असल्याने नदीपत्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आह़े .
दगडपारवा धरणात ९५.९७ टक्के जलसाठा झाला असून धरणाच्या चार दरवाजामधून २४ ऑगस्टला सकाळी ६.३० वाजल्यापासून विद्रूपा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. जवळपास १६४० क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.