अकोला : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने क्षयरोग निर्मूलनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या क्रार्यक्रमासाठी ५४ निक्षयमित्रांनी नोंदणी केली आहे. या निक्षयमित्रांकडून ६२ क्षयरुग्णांना दत्तक घेऊन पोषण आहार किटचे वितरण करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी निक्षयमित्र होऊन मोहिमेची सुरुवात केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, बालसंगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजीकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनिष शर्मा आदीकडून मार्गदर्शन घेतल्या जात आह़े. स्वयंसेवी संस्था, गणेशोत्सव मंडळे यांचाही सहभाग मिळविण्यात येत आहे. विप्र युवक वाहिनी गणेश मंडळाकडून 10 क्षयरुग्णांना पोषण आहार किट वितरीत करण्यात आल्याचे. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनिष शर्मा यांनी सांगितले. नागरिकांनीही निक्षयमित्र होऊन क्षयरुग्णांना दत्तक घ्यावे. असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.