LPG Gas Cylinder | घरगुती गॅसबाबत तक्रार निवारणासाठी हेल्पलाइन

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे
LPG Booking Rule
LPG Booking RulePudhari
Published on
Updated on

अकोला : घरगुती गॅसबाबत जिल्हयातील नागरिकांकडून दूरध्वनी संदेशाद्वारे प्राप्त होणा-या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा पुरवठा कार्यालय अकोला येथे "तक्रार निवारण कक्ष" स्थापन करण्यात आला आहे. याचा हेल्पलाईन क्रमांक 8010153780 असा सुरू करण्यात आली आहे.

गॅस ग्राहक नागरिकांच्या गॅस सिलेंडर बाबत काही समस्या असल्यास सदर हेल्पलाईन क्रमांक व्हॉटस ॲप वर मेसेजद्वारे पाठविण्यात याव्यात. ज्यामुळे आपल्या तक्रारी थेट संबंधीत गॅस एजन्सीला, कार्यालयास मेसेज करून पाठविण्यास सुलभ होईल तसेच वेळेची बचत होईल, गॅस वेळेत मिळण्यास सोईचे होईल. 

या कार्यालयात गॅस‍ एजन्सीमधील गॅस वितरणाबाबत दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारचा गॅस तुटवडा नसून नागरिकांना वेळत गॅस सिलेंडर वितरण होत आहे. गॅस ग्राहकांची केवायसी सुध्दा होत असून फक्त केवायसी करीताच गॅस एजन्सी मध्ये यावे. गॅस एजन्सीमध्ये नागरिकांना शेड, पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा केलेली आहे. नागरिकांनी घरूनच मोबाईलवर गॅस बुकींग करावे. नागरिकांनी शक्यतोवर द्वारपोच गॅस सिलेंडरचाच लाभ घ्यावा.

भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी गॅस एजन्सीमध्ये अनावश्यक गर्दी करू नये.  कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शासन, प्रशासन आपल्या सोबत आहे, नागरिकांना वेळेत गॅस सिलेंडर उपलब्ध करण्याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून पेट्रोलियम कंपन्यांशी दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news