Farmer Died In Lightning
वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू Pudhari File Photo

अकोला : अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

शेतामध्ये काम करत असताना मृत्यू
Published on

शेतामध्ये काम करत असताना अंगावर वीज पडून मूर्तिजापूर तालुक्यातील शेलु बोंडे येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.21) दुपारी घडली. पावसाचे वातावरण झाल्यानंतर झाडाचा आश्रय घेण्यासाठी शेतकरी उभा होता. यावेळी शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. नामदेव रामजी सरोदे (रा. शेलू बोंडे) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

Farmer Died In Lightning
शेतामध्ये काम करताना वीज कोसळून महिलेचा मृत्यू

प्राप्त माहिती नुसार, नामदेव हे आपल्या शेतात काम करीत होते. अचानक शनिवारी (दि.22) विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसास सुरुवात झाली. यावेळी नामदेव सरोदे यांनी शेतातील बाभळीच्या झाडाचा आश्रय घेतला. मात्र नामदेव सरोदे यांच्या मुलाचा अंकुश सरोदे यास फोन आला की बाबा दिसले काय, तेव्हा बाजूलाच असलेल्या शेतात अंकुश यांनी पाहिले असता नामदेव रामजी सरोदे हे बाभळीच्या झाडाखाली पडलेले दिसले. त्यांना तत्काळ स्थानिक लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्याचा वीज पडून मृत्यू झाल्यासंदर्भातील फिर्यादीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आह़े .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news