Akola News | जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा नाही, अफवावर विश्वास ठेऊ नये

जिल्हा पुरवठा अधिकारी यांची माहिती
Akola fuel news
Akola fuel news
Published on
Updated on

अकोला : आखाती देशांमध्ये युद्ध सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवा पसरत आहेत. तथापि, जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, गॅस आदी इंधनाचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे पेट्रोलपंपावर गर्दी करू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नावार यांनी केले आहे.  

जिल्ह्यातील बीपीसीएल, एचपीसीएल, आयओसीएल आदी तेल कंपन्यांच्या पेट्रोलपंपांवर अतिरिक्त इंधन भरण्यासाठी वाहनांची गर्दी होत आहे.  जिल्ह्यात पेट्रोलपंपांमध्ये पेट्रोलियम पदार्थ- डिझेल, पेट्रोल, सीएनजी, तसेच एल.पी.जी. गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा असून इंधन पुरवठा सुरळीत सुरू आहे, असे तेल कंपन्यांच्या अधिकारी व प्रतिनिधींनीही स्पष्ट केले आहे.  

जिल्हयात कोणत्याही प्रकारचा इंधन तुटवडा नाही. सर्व पेट्रोलपंपावर नियमितपणे इंधनाचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरीकांनी पेट्रोलपंपावर अनावश्यक गर्दी टाळावी तसेच अफवांवर विश्वास ठेवून नये, असे आवाहन  यन्नावार यांनी केले.  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news