

बार्शिटाकळी तालुक्यातील निहिदा गावातील ३० वर्षीय युवकाने विषप्राशन केल्याची घटना घडली होती . उपचारादरम्यान या युवकाचा शुक्रवारी (दि.२) रोजी मृत्यू झाला आह़े. प्राप्त माहिती नुसार, निहिदा येथील किसनराव थोटे यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. नैसर्गिक संकटामुळे शेतात पेरलेल्या पिकाचे हवे तसे उत्पन मिळाले नाही. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढतच चालला होता. या कारणामुळे गुणवंत किसनराव धोटे (वय.३०) या युवकाने विष औषध प्राशन केले होते. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असतांना शुक्रवारी (दि.२) मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.