Akola : धामणा येथे कॉलराची साथ; एकाचा मृत्यू

गावातील घरोघरी जाऊन सर्वेक्षण; नागरिकांची तपासणी
Akola News
धामणा येथे कॉलराची साथ; एकाचा मृत्यू
Published on
Updated on

अकोला : अकोट तालुक्यातील धामणा बुद्रुक येथील एका रूग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बुधवारी (दि.२) उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हा रूग्ण कॉलराबाधित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे धामणा गावात कॉलराची साथ असल्याचे जाहीर करण्यात आले असून आरोग्य विभागाच्या ४ पथकांद्वारे या गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे.

गावात ८० घरे असून प्रत्येक घरी तपासणी करण्यात आली आहे. ताप, मळमळ, पोटदुखी, हगवण, डोकेदुखी अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींना तातडीने उपचार मिळवून देण्यात येत आहेत. ठिक-ठिकाणच्या पाण्याचे १५ नमुने तपासण्यात येत आहेत. सर्वेक्षण, उपचारासाठी २ वैद्यकीय अधिकारी, १ समुदाय आरोग्य अधिकारी, २ आरोग्य सहायक, ४ आरोग्यसेवक, ३ आशासेविका, अंगणवाडी सेविका असे मनुष्यबळ कार्यरत आहे. यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने सर्वेक्षण करत असताना पिण्याचे पाणी उकळून व आर. ओ. पाण्याचा वापर किंवा मेडिक्लोरचा उपयोग करण्याच्या सूचना नागरिकांना दिला.

जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांच्याकडून साथ नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणेला सूचना देण्यात येत आहेत. नागरिकांना ताप, मळमळ, हगवण, पोटदुखी, डोकेदुखी असे कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरित गावात पथकामार्फत तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गाढवे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news