अकोला : अस्वलाचा शेतमजूरावर हल्ला

शेतमजूर रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर
Bear Attack in Chichpani
चिचपाणीमध्ये शेतमजूर अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी File Photo
Published on
Updated on

अकोला - अकोट तालुक्यातील चिचपाणी शिवारामध्ये काम करत असलेल्या शेतमजूरावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.3) घडली. अस्वलाच्या हल्ल्यामध्ये शेतकरी गंभीर जखमी झाला. शामसिंग फुलसिंग चव्हाण (वय.४५) असे जखमी झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.

Bear Attack in Chichpani
सातारा : परळी खोऱ्यातील सांडवली येथे अस्वलाचा हल्ला, वृद्ध गंभीर जखमी

अकोट तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या चिचपाणी परिसरात वन्यप्राण्यांचा संचार असतो. या शेतशिवारात शेतात काम करीत असताना चव्हाण या शेतमजुरावर अस्वलाने हल्ला केला. यामध्ये ते जखमी झाल्याने त्यांच्यावर अकोट ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर अकोला सर्वोपचार रुग्णालयात उपचाराकरीता पाठविण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news