

अकोलाः अकोट येथील शेतात मजुरीने हरभऱ्याला पाणी देण्यासाठी स्प्रिंकलर उचलत असताना वरून जात असलेल्या ३३ के. व्ही. विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने शॉक लागून शुभम श्याम नाथे हा २३ वर्षीय युवक भाजला आहे. ही घटना सोमवार, २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजेदरम्यान घडली.
प्राप्त माहिती नुसार या संदर्भात जखमीचा भाऊ निलेश रामदास नाथे याने विद्युत निरीक्षक, कार्यालय अकोला येथे तक्रार केली. शुभम नाथे हा ७० टक्के जळाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.