

अकोलाः जलवाहिनी ला गळती लागल्यामुळे अकोट तालुक्यातील ८४ खेडीपाणीपुरवठा योजनेअंर्तगत येणाऱ्या भागात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आह़े .
जिल्ह्यातील अकोट ८४ खेडी पाणी पुरवठा योजनेची ६१० मीमी व्यासाची जलवाहिनीला लसेच ९०० मीमी जलवाहिनीला गळती लागल्यामुळे लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. ही गळती थांबविण्यासाठी जलवाहिनी दुरूस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे या योजनेचा पाणी पुरवठा ४ ते ५ नोव्हेंबरदरम्यान बंद राहणार असल्याबाबत नागरिकांनी दखल घेण्याचे आवाहन मजीप्रा कडून करण्यात आले आह़े .
अकोट ८४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या एमआयडीसी रोडवरील ६१० मोमी व्यासाच्या लाइनवर निमकर लेआउटजवळ, शेतामध्ये मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे. तसेच श्याम वे ब्रिजजवळ हिवखेड रोड येथे ९०० मीमी व्यासाची मुख्य जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती निर्माण झाली आहे. त्यामुळे गळती दुरुस्तीचे काम सुरू करण्यासाठी ४ व ५ नोव्हेंबर या दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे.