

अकोला : अकोट तालुक्यातील वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या दरम्यान बोर्डी येथील शेतकरी लक्ष्मण शालिकराम गुरेकार यांच्या शेतात वीज पडून दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.१२) शिवपूर, कासोद शेतशिवारात घडली.
या परिसरात अवकाळी पावसामुळे फळ पिकांना फटका बसला आहे. बोर्डी येथील शेतकरी लक्ष्मण गुरेकार यांच्याकडे दोन एकर शेती आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बैलजोडी भाड्याने देऊन स्वतः वाहिती करून ते मोलमजुरी करतात. वीज कोसळून बैलजोडी दगावल्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. घटनेनंतर तलाठी खामकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.