

अकोला : वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजुराचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना ८ फेब्रुवारी रोजी सकाळी तेल्हारा तालुक्यातील मनात्री येथे घडली. तेंगणू प्रधान असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी तेल्हारा पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार , पांडे इंगलू प्रधान (५२) रा. किहरपूर (छत्तीसगड) ह. मु. मनात्री यांनी पोलिसात या प्रकरणी तक्रार दिली. येथील वीटभट्टीवर आपल्या भावासह काम करतात. ८ फेब्रुवारी रोजी काम करीत असताना भट्ट्यावरील ट्रॅक्टर मुंडा क्रमांक एमएच ३० एबी ७८९८ हा गणेश पवार मागे आणत असताना तेंगणू प्रधानचा पाय घसरल्याने ते ट्रॅक्टरला जोडलेल्या गारा मशीनच्या मागच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तेल्हारा येथे उपचाराकरिता आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.