अकोला: आरटीई प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ

अकोला: आरटीई प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ
अकोला, पुढारी वृत्तसेवा: शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता १७ मे पासून सुधारित आरटीई शाळा प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात १७ ते ३१ मेपर्यंत पालकांना ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. यानंतर पुन्हा ४ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, ही मुदतवाढ अंतिम असेल, अशी  सूचना शिक्षण संचालक यांनी दिली आहे.
गेल्या १७ मेपासून पालकांकडून ऑनलाइन शाळा प्रवेश अर्ज करण्यासाठी पालकांचा वाढता प्रतिसाद दिसत आहे. नवीन बदलानुसार जिल्ह्यामध्ये १९७ शाळांमधील २०१४ जागांसाठी पालकांकडून अर्ज करण्यात येत आहेत.
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेच्या शाळा प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ मे होती. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ प्रवेश प्रक्रिया जूनमध्ये सुरु होत आहे. आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेस दिनांक ३१ मेनंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही. अशा सूचना शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना शिक्षण संचालक यांनी पत्राद्वारे दिल्या होत्या. मात्र, पुन्हा ४ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून ही अंतिम असणार आहे.

ऑनलाईन प्रवेश अर्ज  दि. ४ जून या मुदतीपूर्वी भरावेत. आरटीई शाळा प्रवेशासाठी ही अंतिम  मुदतवाढ आहे, असे आवाहन    पालकांना करण्यात येत आहे.


रतनसिंग पवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक,  जि. प. अकोला) 
हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news