Akola news | महसूल विभागाचा दणका! कंझरा येथे अवैध मुरूम वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

तपासात चालकांकडे कोणतेही कायदेशीर कागदपत्रे नसल्याचे आढळून आले आहे
Akola news | महसूल विभागाचा दणका! कंझरा येथे अवैध मुरूम वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Published on
Updated on

अकोला : मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कंझरा परिसरात महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. विनापरवाना आणि विना क्रमांकाच्या दोन ट्रॅक्टरद्वारे मुरूमाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, २९ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास महसूल विभागाच्या पथकाने कंझरा येथे नाकाबंदी केली होती. यावेळी दोन विना नंबरचे ट्रॅक्टर संशयास्पदरित्या मुरूम खाली करताना आढळून आले. पथकाने चालकांना थांबवून मुरूम वाहतुकीचा परवाना (रॉयल्टी) किंवा अधिकृत पासबाबत विचारणा केली असता, चालकांकडे कोणतेही कायदेशीर कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले.

जप्त केलेला मुद्देमाल

विनापरवाना गौण खनिजाची चोरी केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे प्रशासनाने खालील मुद्देमाल जप्त केला आहे: दोन विना क्रमांकाचे ट्रॅक्टर (मुंडा व ट्रॉलीसह): अंदाजे किंमत ४ लाख रुपये. तर दोन ब्रास मुरूम: अंदाजे किंमत ४ हजार रुपये इतकी होती.

ट्रॅक्टर चालकांविरुद्ध गुन्हा दाखल

शासकीय नियमांचे उल्लंघन करून गौण खनिजाची चोरी केल्याप्रकरणी महसूल विभागाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही ट्रॅक्टर चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे परिसरात अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news