Akola Accident | दोन दुचाकींची समोरासमोर धडक: दोन ठार, महिला जखमी

मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथे दुचाकी एकमेकांवर आदळल्या
Accident News
Accident NewsPudhari
Published on
Updated on

Bike collision Murtizapur Akola

अकोला :  मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथे दुचाकी एकमेकांवर आदळल्याने दोघे ठार झाले. तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.10) सकाळी 9.30 च्या दरम्यान घडली. रविकांत लुंगे (रा. पारवा), चेतन ताटके (रा. चिखली) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार, पारवा येथील रविकांत लुंगे हे आपल्या पत्नीसह मोटारसायकल (एमएच 37 पी 2598) ने हिरपूर मार्गे जात होते. हिरपूरजवळ  समोरून दुचाकी  (एमएच 30 बीएस 5312) ही  लुंगे याच्या गाडीवर आदळली. दोन्ही दुचाकी चालक व मागे बसलेली महिला  सिमेंटच्या रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्यावर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना स्थानिक लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Accident News
Akola Accident | अज्ञात वाहनाने कळपातील २० मेंढ्या चिरडल्या, २५ गंभीर जखमी

रविकांत लुंगे यांची पत्नी केशर रविकांत लुंगे या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ उपचाराकरीता अकोला सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले . या प्रकरणी मूर्तिजापूर  ग्रामीण पोलीस पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला  पुढील तपास ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news