

अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस ११ नोव्हेंबर रोजी युवकाने पळवून नेल्याची तक्रार मूर्तिजापूर शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. तपासात ही अल्पवयीन मुलगी सहा महिन्याची गर्भवती असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ११ नोव्हेंबरला एका अल्पवयीन मुलीस २१ वर्षीय युवकाने फूस लावून पळवून नेले होते. २६ नोव्हेंबर रोजी रात्री पीडित अल्पवयीन मुलीने पोलिस ठाण्यात ती गर्भवती असल्याची माहिती पोलिसांना सांगितली. या माहितीवरून युवक विशाल अतिश राऊत (वय २१, रा. पिंपरी मोडक,सध्या ब्राह्मणवाडा ता. कारंजा) याच्याविरुद्ध मूर्तिजापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत .