

Akola Flood Alert
अकोला : अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथील काटेपूर्णा धरणाचे सहा दरवाजे आज (दि.१८) सकाळी उघडले आहेत . नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही या पूर्वीच देण्यात आला आहे.
काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असून धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आज सकाळी 8:30 वाजता काटेपूर्णा प्रकल्पाचे 6 द्वारे 60 सें.मी.उंचीने उघडून एकूण 254 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याच्या येव्या नुसार सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये कमी जास्त प्रमाणात आवश्यक बदल करण्यात येईल. नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे तसेच नदी पात्र ओलांडू नये. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.