

अकोला, - जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा उद्या २८ जानेवारी सकाळी ११ वा. आयोजिण्यात आला आहे. मेळाव्याद्वारे सुमारे २५० विविध पदे भरण्यात येणार आहेत.
या मेळाव्यात भारतीय जीवन विमा, इनोट्रो मल्टिसर्व्हिसेस, क्ल्याड मेटल इंडिया, ऋचा इंजिनीअरिंग, टॅलेनसेतू सर्व्हिसेस, उत्कर्ष स्मॉल फायनान्स, इक्विटस स्मॉल फायनान्स, डेक्कन मॅनेजमेंट सर्व्हिसेस आदी पुणे, छत्रपती संभाजीनगर, अकोला येथील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.
इच्छूकांनी परिचयपत्र, कागदपत्रे, दोन छायाचित्रांसह मुलींच्या आयटीआय येथे उपस्थित राहावे. रोजगार विभागाच्या महास्वयम पोर्टलवर नोंदणी असल्यास सेवायोजन आयडी व पासवर्ड वापरून ऑनलाईन सहभाग घेता येईल.