

अकोलाः राष्ट्रीय महामार्गावर वाशिंबा बसथांब्यानजीक 12 डिसेंबरला दुचाकीची दुभाजकासह विद्युत खांबाला धडक लागली . या अपघतात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला.
प्राप्त माहिती नुसार, दुचाकी क्रमांक एमएच 30 बीएक्स 1568 ने सोपान नारायण धारपवार हा युवक मूर्तिजापूरकडून अकोल्याकडे जात होता. यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील वाशिंबा नजीक दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तो रस्त्यावरील दुभाजकासह लोखंडी विद्युत खांबाला धडकला. या अपघातात युवकाचा घटनास्थळी मृत्यू झाला. बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला होता . याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.