अकोला जिल्ह्यात शुक्रवार ठरला अपघातवार ; तीन अपघात - तीन ठार
अकोला : अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यात कोलविहीर जवळ आणि बाळापूर तालुक्यातील गायगाव तसेच राष्ट्रीयमहामार्गावर कोळंबी दाळबी नजीक वेगवेगळ्या अपघातात शुक्रवारी 27 डिसेंबरला तिघांचा मृत्यू झाला आहे. सरत्या वर्षांचा शुक्रवार जिल्ह्यासाठी अपघाताचा दिवस ठरला.
प्राप्त माहिती नुसार, अकोट तालुक्यातील कोलविहिर ते उमरा गावाजवळ अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ने महावितरण चे कर्मचारी किशोर खरबडे यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये खरबडे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक अमीन शहा अजीम शहा. रा अकोट याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. दुसऱ्या घटनेत राष्ट्रीय महामार्गाने कोळंबी दाळबी जवळ दुचाकीने अकोलाकडे येत असलेल्या शेख शकील शेख जम्मु. रा शेगाव यांना मागून कारने धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. दुचाकीवरील दुसरा सलिमुद्दिन काझी रियाजुद्दिन काझी हा जखमी झाला या घटनेचा बोरगांवमंजू पोलिसांनी पंचनामा केला आहे . तिसऱ्या घटनेत गायगाव येथे शुक्रवारी सायंकाळी बसस्टॉप जवळ पेट्रोल डेपोमधून जाणाऱ्या टँकर ने लक्ष्मण सदाशिव झटाले या वृद्धास धडक दिली. या वेळी त्यांचा जागीच मृत्यु झाला. या प्रकरणी उरळ पोलिसांनी टँकर चालकास अटक केली आहे .

