

Akola Food Poisoning Case Dead Lizard
अकोला: पोह्यात मृत पालीचे मुंडके आढळल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने हॉटेल ची तपासणी केली. या हॉटेलमध्ये गंभीर त्रुटी आढळल्यानंतर हॉटेलला सील ठोकण्यात आले. तसेच हॉटेलचा परवानाही अन्न व औषध प्रशासन विभागाने निलंबित केला आहे.
प्राप्त माहिती नुसार, गोरेगाव येथील शेख सोहेल यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्या नातेवाइकांनी रुग्णालयासमोरील अग्रवाल हॉटेलमधून पोहे आणले. पोहे खात असतानाच त्यांना या पोह्यात मृत पालीचे मुंडके दिसून आले. त्यांची प्रकृती आणखी बिघडल्याने अग्रवाल हॉटेलमधील खाद्यपदार्थ सुरक्षित नसल्याचा आरोप रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी केला.
याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती दिल्यानंतर त्यांनी दोन दिवस तपासणी केली. त्यामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या.त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करत या हॉटेलला सील लावून परवाना निलंबित केला आहे