एकतर्फी प्रेमातून संताप: लग्नासाठी दबाव टाकला, तरुणीने नाकारले तर भररस्त्यात केला विनयभंग

Molestation Case | संबंधित तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
Molestation Case
Molestation CasePudhari
Published on
Updated on

अकोला : मूर्तिजापूर येथील दर्यापूर रोडवरील उड्डाणपुलावर एका २८ वर्षीय तरुणीचा पाठलाग  करत तिचा विनयभंग केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील २८ वर्षीय तरूणी आणि आरोपी तरुण  जतिन वसंत संघवी (वय २९, रा. टांगा चौक, जुनी वस्ती, मूर्तिजापूर) यांची एका वर्षापूर्वी ओळख होऊन त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र, आरोपीचा रागीट स्वभाव आणि सततचा त्रास यामुळे तरुणीने संबंध तोडले होते. त्यानंतरही हा तरुण तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता. 

रविवारी ५ सकाळी १० वाजताच्या  सुमारास तरुणी घरातून शहराकडे जात असताना दर्यापूर रोडवरील उड्डाणपुलावर या तरुणाने तिचा रस्ता अडवला. यावेळी त्याने जबरदस्तीने तिचा हात पकडून अश्लील हेतूने वर्तन करत विनयभंग केला.  तरुणीने अशा आशयाची तक्रार शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल दिली. या  प्रकरणी तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news