

अकोला : उरळ पोलिसांनी ४८ तासांत बैलजोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत एका आरोपीला अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार रामेश्वर नारायण इंगळे राहणार डोंगरगाव यांनी बैलजोडी चोरीची तक्रार उरळ पोलिसात दाखल केली होती. तक्रारीवरून बैलजोडी कोठ्यातून 19 जुलै रोजी चोरी गेली होती. तेव्हा पोलिसांनी अपराध क्रमांक २७६/२६ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरीस गेलेली पांढऱ्या रंगाची व गोल शिंगे असलेली अंदाजे ८० हजार रुपये किमतीची बैलजोडी हस्तगत केली.
या प्रकरणी संजय भीमराव अघडते रा. धामणगाव, ता. अकोट, जि. अकोला याला ताब्यात घेऊन गुन्ह्याची उकल करण्यात आली.