Akola crime |अवैध देशी विक्रेते व हातभट्टीवर पोलिसांच्या धाडी

पाच जणांविरुध्द गुन्हे दाखल, अकोट ग्रामीण पोलिसांची कारवाई
Akola crime |अवैध देशी विक्रेते व हातभट्टीवर पोलिसांच्या धाडी
Akola crime |अवैध देशी विक्रेते व हातभट्टीवर पोलिसांच्या धाडीPudhari
Published on
Updated on

अकोला : अकोट ग्रामीण पोलिसांनी  अकोलखेड, बोर्डी, मुंडगांव, करतवाडी अशा विविध ठिकाणच्या अवैध देशी दारू विक्रेत्यांवर कारवाई केली तर शहानूर येथे सुरू असलेल्या हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर धाड घालून अड्डा उध्वस्त केला. या सर्व कारवायांमध्ये ५ आरोपींविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, गोपनीय माहिती वरून शहानूर येथे सुरू असलेल्या हातभट्टीवर पोलिसांनी धाड टाकून यामध्ये ७३ हजार ९२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुंडगांव येथील कारवाईत देशी दारू विक्रेत्याकडून ५ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल, करतवाडी येथील कारवाईत अवैध देशी दारू विक्रेत्याकडून ५ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अकोलखेड येथे अवैध देशी दारू विक्री करणार्‍या इसमावर कारवाई करून त्याच्याकडून १० हजार २०० रूपयांचा मुद्देमाल, बोर्डी येथील कारवाईत अवैध देशी दारू विक्रेत्याकडून १० हजार १०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून याप्रकरणी ५ आरोपींविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news