

अकोला - एका पोलिस अधिकाऱ्याने तरुणीची छेड काढल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी शुक्रवारी बाळापूर पोलीस स्टेशनला पोलीस अधिकाऱ्या विरुध्द गुन्हा दाखल करून अटकही करण्यात आली आहे.
अकोला- खामगाव राष्ट्रीय महार्गावरील शळद फाटा ते व्याळा रस्त्यावरील पुलावर ही घटना घडली आहे.प्राप्त माहिती नुसार तक्रार करणारी तरुणी अकोला शहरात भाड्याने राहते. बाळापुर शहरातल्या एका कार्यालयात ती कार्यरत आहे. नेहमीप्रमाणे ती अकोल्याहून बाळापूर येथे येणे जाणे करते.
तरुणीने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की ,शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कार्यलयातील काम आटोपून ती बाळापूरहून अकोल्याकडे निघाली असता, वाटेतच पोलीस अधिकारी शंकर सुरेश बोंडे तिच्या मार्गावर लागला. काही किमी अंतरावर तिचा पाठलाग करून थोडं दूर गाडी आडवी लावली, आणि मला २ मिनिटे बोलायचे आहे असे म्हणत अश्लील इशारे करू लागला. त्यानंतर तरुणीने अकोला पोलिसांच्या डायल ११२ वर कॉल केला. तिथे जुने शहर पोलीसस्टेशनचे पोलिस कर्मचारी दाखल झाले.
तरुणीला पोलीस मदत मिळाली तिला बाळापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीनंतर छेड काढणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. सदर पीएसआय शंकर सुरेश बोंडे अकोल्यातील रामदास पेठ पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. या प्रकरणी बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक माधुरी पाटील पुढील तपास करीत आहेत.