

अकोलाः तेल्हारा येथील बस स्थानकाजवळ घोडेगाव रोड लगत च्या गोडावूनमध्ये अज्ञात चोरट्याने रात्री शटरचे कुलूप तोडले आणि सी सी टिव्ही कॅमेरे तोडले तसेच रोखसह २ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहिती नुसार तेल्हारा बस स्टॅन्ड जवळ घोडेगाव रोड येथे असलेल्या गोडाऊन मध्ये १४ फेब्रुवारी ते रविवार १५ फेब्रुवारी चे सकाळी ७.३० वाजे दरम्यान अज्ञात चोराने गोडाऊनचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली . व्हीसीआर बॉक्स लंपास केला .फिर्यादी राजेश भीमराव खारोडे रा. राधेनगर तेल्हारा यांच्या मालकीच्या गोडाऊनला ते १४ फेब्रुवारीला रात्री कुलूप लावून घरी निघून गेले होते.
दुसरे दिवशी रविवारी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता गोडाऊन उघडण्याकरिता आले असता त्यांना गोडाऊनच्या शटरला लावलेले कुलूप दिसून आले नाही. शटर उघडून पाहणी केली असता अज्ञात चोराने गोडाऊन मधील सॅमसंग कंपनीचा मोबाईल, नगदी १ लाख १५ हजार रुपये, आरओच्या ४ मशीन , तीन डब्यात ठेवलेले १० रुपयांचे कलदार किंमत १ हजार ७०० रुपये आणि सॅमसंग कंपनीचा सीसीटीव्ही व्हीसीआर बॉक्स असा एकूण २ लाख ५७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोराने चोरून नेल्याची फिर्याद तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये दिली . पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.