पुंडा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस, पिकांचे मोठे नुकसानPudhari Photo
अकोला
Akola Rain | पुंडा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस, पिकांचे मोठे नुकसान
शेतात पाणी साचल्याने पिके गेली पाण्याखाली : जिल्ह्यात इतर ठिकाणी मात्र पावसाची प्रतिक्षाच
अकोला : जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पुंडा येथे सुमारे आज 11ते 12 वाजे पर्यंत ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्या मुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. जिल्ह्यात ईतर ठिकाणी मात्र सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत .
अकोट तालुक्यातील पुंडा परिसरातील बांबर्डा ,रोहनखेड येथे संततधार पावसाने हजेरी लावली. त्या मुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे आणि पिके पाण्याखाली गेली आहेत .
शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे . परिसरातील काही लहान-मोठ्या नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यात काही तालुक्यात ढगाळ वातावरण असून अकोला शहरात सकाळीच पावसाने हजेरी लावली .मात्र दुपारनंतर अकोला शहरात उन्हं तापत असल्याचे दिसत आहे .

