Akola News : बार्शीटाकळीतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा तहसिलदार कार्यालयावर मोर्चा

तहसिलदारांना विविध मागण्यांचे निवेदन
Akola News
बार्शीटाकळीतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा तहसिलदार कार्यालयावर मोर्चा
Published on: 
Updated on: 

अकोला : पावसाअभावी शेतातील पिके करपून गेली आहेत. या संकटामुळे बार्शीटाकळी तालुका तातडीने सरसकट दुष्काळग्रस्त घोषित करावा, यासह विविध मागण्यांसाठी 'शेतकरी संघर्ष समिती'च्या वतीने गुरुवारी (दि. २४ ) बार्शीटाकळी येथील तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

मोर्चापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकर्‍यांची भव्य सभा पार पडली. या सभेनंतर नगरपंचायत चौक आणि बायपास चौकामार्गे शेतकरी हिताच्या आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. त्यानंतर तहसिलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.या मोर्च्यामध्ये तालुक्यातील शेतकरी व शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या निवेदनात, सरकारने बार्शीटाकळी तालुका सरसकट दुष्काळग्रस्त घोषित करून, शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयांचे अनुदान द्यावे तसेच शेतमजुरांना दहा हजार रुपयांची मदत देऊन रोजगार हमीचे कामे सुरू करावीत. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व पिक विमा देण्यात यावा, शेतकऱ्याला रब्बी हंगामात बी बियाणे तसेच खते विनामूल्य देण्यात यावे. पाणी व चारा टंचाईची समस्या तात्काळ सोडवून सिंचनासाठी आठ तास वीज उपलब्ध करून द्यावी. जमकेश्वर येथील तेहतीस केवी केंद्र तात्काळ चालू करावे, आदी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या. या मोर्चात मोठ्या संखेने शेतकरी सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news