

अकोला, पुढारी वृत्तसेवा : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हातरुण गावात दोन गटात शुल्लक कारणावरून वाद उफाळला. यावेळी मारहाण व दगडफेक करण्यात येऊन एक चारचाकी गाडी जाळण्यात आली. ही घटना दुपारच्या सुमारास घडली. या घटनेतील जखमींना अकोला सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती आहे. (Akola Crime News)
या घटनेबाबत प्राप्त प्राथमिक माहिती नुसार, बाळापूर तालुक्यातील हातरुण येथे दोन गटात शुल्लक वाद झाला. त्यानंतर दगड फेक करण्यात आली. या घटनेत सहा जण जखमी झाले आहेत. यावेळी चारचाकी गाडी जाळण्यात आली. दरम्यान हातरुण गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. जखमींवर जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. या प्रकरणी उरळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.