

Akot Akolkhed Woman Death
अकोला : अकोट तालुक्यातील अकोलखेड येथील शेतशिवारात मेंढरांचे पिल्लू वाचविण्याच्या प्रयत्नात एका महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २ जून रोजी घडली.
प्राप्त माहिती नुसार,कारला येथील मेंढीपालन करणारे कुटुंब अकोलखेड शेतशिवारात मेंढ्या चारण्यासाठी आले आहेत. दरम्यान मंगळवारी २२ वर्षीय उषा दिपक पारखे हिला मेंढराचे लहान पिल्लु विहीर जवळ गेल्याचे दिसले.ते विहीर पडुन नये या प्रयत्नात पिल्लू हाकलत असताना तोल जावून ही महिला विहीरीत पडली. या घटनेत तीचा दुदैवी मृत्यू झाला.