संतापजनक! शाळेतील कर्मचाऱ्याकडूनच १० विद्यार्थिनींचा विनयभंग

अकोला येथील घटना
Akola News
संतापजनक! शाळेतील कर्मचाऱ्याकडूनच १० विद्यार्थिनींचा विनयभंगFile Photo
Published on
Updated on

अकोला : पुढारी वृत्तसेवा

अकोला शहरातील कौलखेड भागातील एका शाळेत कर्मचाऱ्यानेच तब्बल १० चिमुकल्या विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी जिल्हा व महिला बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत चाइल्ड हेल्पलाइनच्या महिला समन्वयकाने दिलेल्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.

हेमंत चांदेकर असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. शाळेतील काही महिला शिक्षिका प्रशिक्षणासाठी ५ मार्चपासून बाहेरगावी गेल्या होत्या. शाळेचे कामकाज सांभाळण्याची जबाबदारी चांदेकर याच्याकडे दिली होती. त्याने या परिस्थितीचा गैरफायदा घेत चौथीत तसेच सातवीत शिक्षण घेणाऱ्या दहा विद्यार्थिनींचा विनयभंग केला. शिक्षिका प्रशिक्षण संपवून परत आल्यानंतर काही विद्यार्थिनींनी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार त्यांना सांगितला. यानंतर शिक्षण संस्थाचालकांनी चांदेकर याला ८ मार्चपासून शाळेत कर्तव्यावर न येण्याचा आदेश दिला. त्याच्याविरोधात खदान पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली. प्राप्त तक्रारीवरुन खदान पोलिसांनी विविध कलमान्वये चांदेकर याच्यावर गुन्हे दाखल करून अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news