Omicron in Nagpur : नागपुरात ओमायक्रॉन चा शिरकाव; ४० वर्षीय व्यक्तीला झाली लागण | पुढारी

Omicron in Nagpur : नागपुरात ओमायक्रॉन चा शिरकाव; ४० वर्षीय व्यक्तीला झाली लागण

नागपूर; पुढारी वृत्तसेवा

मुंबई आणि पुण्यानंतर ओमायक्रॉन या व्हेरियंटने उपराजधानी नागपूरमध्ये शिरकाव केलाय. नागपूरमध्ये ४० वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. ओमायक्रोन पॉझिटीव्ह आढळलेल्या रुग्णाचा पश्चिम आफ्रिकेतील प्रवासाचा इतिहास आहे. हा व्यक्ती नागपुरात परतल्यानंतर त्याची कोरोना चाचणीसह जीनोम सिक्वेन्सिंग ही करण्यात आली होती. त्यानंतरच त्याला ओमायक्रोन संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले. (Omicron in Nagpur)

दिलासादायक बाब म्‍हणजे,  या रुग्णाची प्रकृती स्थिर असून तो रुग्णालयात उपचार घेतोय. संबंधित रुग्णाच्या कुटुंबातील इतर सदस्य निगेटिव्ह आले आहेत. त्यांनाही विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. संबंधित रुग्णच्या संपर्कातील इतर लोकांचा शोध घेतला जात असून, त्यांच्या सर्वांच्या चाचण्या प्रशासनाकडून केल्या जाणार आहेत. चार डिसेंबर रोजी संबधित व्यक्तीचे नागपूर विमानतळावर नमुने घेतले होते. यामध्ये तो कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले होते. जनुकीय चाचणीत (जिनोम सिक्वेन्सिंग) त्याला ओमायक्रॉन असल्याचे निदान झाले आहे. (Omicron in Nagpur)

राज्‍यातील ७ रुग्ण ‘ओमायक्रॉन’मुक्त

राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या १८ वर पोहचली आहे. त्यापैकी ७ जणांना रुग्ण ‘ओमायक्रॉन’मुक्त झाले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये १० , मुंबईत चार, पुण्यात एक आणि डोंबिवलीमध्ये एक ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला होता. मुंबई आणि पुण्यानंतर ओमायक्रॉन व्हेरियंटने नागपूरमध्येही शिरकाव केलाय.

हेही वाचले का?

Back to top button