Mohan Bhagwat on Reservation: आरक्षणाबाबत ‘RSS’चे सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान, म्हणाले… | पुढारी

Mohan Bhagwat on Reservation: आरक्षणाबाबत 'RSS'चे सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान, म्हणाले...

नागपूर: पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीही आरक्षणाला विरोध केला नाही. संविधानाने दिलेल्या आरक्षणाची संबंधित घटकाला जोवर गरज आहे, तोवर किंवा सामाजिक दृष्ट्या भेदभाव संपणार नाही, तोपर्यंत आरक्षण दिले गेले पाहिजे, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. Mohan Bhagwat on Reservation

या संदर्भातील उलट सुलट चर्चेनंतर दक्षिण दौऱ्यात भागवत यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ संघाच्या प्रचार विभागामार्फत आज प्रसिद्धीस देण्यात आला आहे. यात डॉ. भागवत यांनी स्पष्ट केले आहे की, मी एक मीटिंग घेताना व यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आरक्षणाला छुपा विरोध आहे. संघाचे लोक उघडपणे बोलत नसले, तरी प्रत्यक्षात त्यांचा आरक्षणाला विरोध असल्याचे सांगणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. Mohan Bhagwat on Reservation

मात्र, हा दावा पूर्णतः खोटा आहे. उलट संघाने सुरुवातीपासून संविधान संमत आरक्षणाचे समर्थनच केले आहे. एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून हल्ली काहीही करता येऊ शकते. त्याचा हा नमुना आहे. सोशल मीडिया निश्चितच चांगला असला तरी त्याचा वापर करणारे चुकताताहेत, चुकीच्या पद्धतीने वापर होत असल्याची खंतही भागवत यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा 

Back to top button