

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: बजरंगबली बुद्धी आणि शक्ती दोन्ही देतात. आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने मी आमच्यासाठी बुद्धी मागितली आणि विरोधकांना सद्बुद्धी मागितली, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. टेकडी रोडवरील भव्य महाप्रसाद निमित्ताने हनुमानाच्या दर्शनासाठी आल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
तत्पूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही हनुमंताचे दर्शन घेतले. फडणवीस म्हणाले की, शरद पवार निराश है, हार की हताशानी ते शिवीगाळीवर आलेले आहेत. जेव्हा जेव्हा मोदींना शिव्या देतात. तेव्हा मोठा विजय आमचा झालेला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतानाचे एक काम दाखवावे, त्यांनी मुंबईतील एक काम दाखवावे, 25 वर्ष मुंबई महापालिकेत त्यांची सत्ता होती, तोंडाच्या वाफा दवडण्यापलीकडे उद्धव ठाकरे यांना काहीही येत नाही. मी उद्धव ठाकरे यांचे भाषण तुम्हाला जसच्या तसं म्हणून दाखवू शकतो, असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा