नागपूर, पुढारी वृत्तसेवा : भाजपने मोदी सरकारच्या नेतृत्वात रोजगाराच्या दृष्टीने अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसने युवकांना आजवर हात दाखवण्याचे काम केले, असा आरोप गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत आज (दि.१५) केला. CM Pramod Sawant
काँग्रेसकडे ना अजेंडा ना कुठली लीडरशिप असून जगाला तिसरी आर्थिक शक्ती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा देशातील जनता तिसऱ्यांदा निवडून देणार आहे. हे तर ट्रेलर आहे अजून पिक्चर बाकी आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला.
काँग्रेसने आजवर जाती धर्माचेच राजकारण केले. जाती धर्मात विभाजन केले, कुठल्याही पायाभूत सुविधाची उभारणी केली नाही, पन्नास वर्षे काँग्रेसचे तर मोदी सरकारचे दहा वर्षे यात मोदी सरकारचे काम सर्वोत्तम असल्याने जनता पुन्हा एकदा त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. CM Pramod Sawant
मुंबई- गोवा हायवेचे काम कोकणामध्ये अर्धवट असले तरी एक पॅच राहिलेला असून हे काम दोन वर्षात पूर्ण होईल, असा दावा सावंत यांनी केला. गोवा स्मार्ट सिटीचे कामाला विलंब झाला असला तरी युवा सेतू, ज्ञान सेतू, अटल सेतू एकदा येऊन अवश्य बघा, केंद्राने या उत्तम कामासाठी अतिरिक्त 100 कोटी दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच मायनिंगचा लिलाव झालेला असून दिल्लीशी लिंक असलेल्या मद्य घोटाळा संदर्भात ईडी आणि सीबीआय चौकशी करीत आहे. असे सांगून कुठल्याही ठिकाणी अंमली पदार्थ पकडले की, त्याचा संबंध थेट गोव्याशी जोडला जातो. गोवा काय अंमली पदार्थाचे मार्केट आहे का ?, असा सवाल त्यांनी केला.
हेही वाचा