Washim News : विविध मागण्यांसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे आजपासून आमरण उपोषण | पुढारी

Washim News : विविध मागण्यांसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे आजपासून आमरण उपोषण

वाशिम, पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने आजपासून (दि.२०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. Washim News

वाशिम जिल्ह्य़ाला नदीजोड (वैनगंगा- नळगंगा ) प्रकल्पातून वगळण्यात आले आहे. या प्रकल्पात वाशिम जिल्ह्याचा समावेश करण्यात यावा, पीकविम्याची अॅग्रीम 25 टक्के व नियमित पीक वीमा शेतकऱ्यांना मिळवा. नाफेड व्दारा सोयाबीन खरेदी करावी. कृषीपंपाला मोफत व मुबलक वीज देण्यात यावी. रोही, रानडुक्कर, हरीण या जंगली जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा. ग्रामीण भागातील गोरगरीबांना मिळणाऱ्या घरकुल अनुदानात दुप्पट वाढ करून सरकारने जागा उपलब्ध करून द्यावी. अथवा जागेसाठी वेगळा निधीची तरतूद करावी. आदी शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. Washim News

उपोषणसाठी भूमिपुत्रचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर, जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, वाशिम तालुकाध्यक्ष संतोष सुर्वे, जिल्हाकार्यध्यक्ष बालाजी बोरकर बसले आहेत. आज विविध संघटना व विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व अनेक शेतकरी व भूमिपुत्रच्या कार्यकर्त्यांनी अंदोलनास भेट दिली.

हेही वाचा 

Back to top button