Chandrasekhar Bawankule : भाजपमध्ये भरपूर स्पेस, कुणालाही नाही म्हणणार नाही: चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

Chandrasekhar Bawankule : भाजपमध्ये भरपूर स्पेस, कुणालाही नाही म्हणणार नाही: चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या गॅरंटीवर तसेच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला सर्व स्तरातून साथ मिळत आहे. अनेक लोक भाजपसोबत येण्याची तयारी करीत आहेत. त्यामुळे आम्ही कुणालाही नाही म्हणणार नाही, आमचा दुपट्टा तयारच आहे, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इतर पक्षांतील नेत्यांना भाजप प्रवेशाचे निमंत्रणच दिले. ते माध्यमांशी बोलत होते. Chandrasekhar Bawankule

जयंत पाटील यांच्याविषयीच्या चर्चेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, शरद पवार यांच्या गटाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील हे वरिष्ठ नेते आहेत, ते कोणाच्या संपर्कात आहे, हे मला माहित नाही, परंतु ते माझ्या संपर्कात नाहीत. मोदींच्या संकल्पाला साथ देण्यासाठी आमच्यासोबत येणाऱ्यांसाठी दुपट्टा तयार असून पक्षात भरपूर स्पेस आहे, कुणालाही नाही म्हणणार नाही. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याबाबतही असेच धोरण आहे. Chandrasekhar Bawankule

दरम्यान, कुणीही आमच्या पक्षात आले, तरी भाजप कार्यकर्ता व्यथित होत नाही. कारण भाजपाचा कार्यकर्ता राष्ट्र प्रथम या भूमिकेतून काम करतो. भाजपा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे, त्यामुळे फार चिंता करण्याची गरज नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याबाबत शपथ घेतली होती. विशेष अधिवेशनात मराठा समाजाला टिकणारे आरक्षण महाराष्ट्र सरकार देईल, असा विश्वास आहे.

निवडणूक जागावाटप अद्याप निश्चित झालेले नाही, उमेदवारीची चर्चा नाही. महायुतीचे तीनही नेते बसतील आणि त्यानंतर जागा वाटप ठरेल. काँग्रेसचे नेते राहुल गांधी जिकडे जातील तिकडे मोदींचा जयघोषच होणार, असा दावा बावनकुळे यांनी यावेळी केला.

हेही वाचा 

Back to top button