चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या श्री प्रभू रामाबद्दलच्या आक्षेपार्ह पोस्टला लाईक करून कॉमेंट्स करण्यात आले. या प्रकरणी भद्रावती येथील एकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. प्रकाश महादेव रामटेके असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी भाजपचे शहर महामंत्री प्रशांत डाखरे यांनी भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली होती.
भद्रावती शहरात आज ( दि. 28) शहर बंदचे आवाहन केले होते. त्याला मोठा प्रतिसाद देत भद्रावती शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बाजारपेठा पूर्णता बंद ठेवण्यात आल्या होत्या. शहरातील सर्वपक्षीय हिंदू बांधवांनी व नागरिकांनी एकत्र येत शहरात निषेध मोर्चा काढून या घटनेचा तीव्र निषेध केला. मोर्चाची सांगता नगरपरिषद कार्यालयाजवळ करण्यात आल्यानंतर सभा घेण्यात आली.
यापुढे अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाही, असा इशाराही दिला. या गैरकृत्यांमध्ये प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
हेही वाचा