ओबीसी प्रश्नाबाबत सरकारची भूमिका उदासीन : विजय वडेट्टीवार | पुढारी

ओबीसी प्रश्नाबाबत सरकारची भूमिका उदासीन : विजय वडेट्टीवार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : कोणी काय बोलते त्याच्याशी आमचे देणं -घेणं नाही. आम्ही आमची भूमिका मांडत राहू. ओबीसी संदर्भात सरकारची भूमिका उदासीन आहे. ओबीसीच्या मतांवर निवडून यायचे आणि त्यांचेच प्रश्न सोडवायचे नाही, अशीच सरकारची भूमिका आहे. या सरकारने ओबीसीचे कोणतेही प्रश्न सोडवले नाहीत. ओबीसी विखुरलेला असून एक होऊ शकत नाही, असा विचार करून सरकार ओबीसीबद्दल काहीही करत नाही असा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहेत. आज सोमवारी (दि. १३) वडेट्टीवार माध्यमांशी बोलताना असे म्हणाले.

संबंधित बातम्या 

अजित पवार यांच्या नाराजीबाबत छेडले असता, अजित पवार कधी खुश राहिले, ते नेहमीच नाराज असतात. मनाप्रमाणे झाले, तर खुश. मनाविरुद्ध झाले, तर नाराज. हम करे सो कायदा अशी त्यांची भूमिका असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.

तीन पक्षाच्या सरकारमध्ये पाहिजे तेथे निधी मिळत नाही, अरे तिजोरीची चावी तुमच्याकडे आहे, तरी निधीसाठी का रडता? आता तुमची धमक दाखवा. महाविकास आघाडीमध्ये धाक दाखवून सर्व तिजोरी साफ करत होतात. तीच धमक आता पवारांनी दाखवावी. निधी मिळत नाही, म्हणून रडण्यापेक्षा दुसऱ्याला रडवण्याची हिंमत आहे का? हे पवांरांनी आता दाखवावे. संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे ते दिल्लीचे चरणदास झाले आहेत. आता ते दादागिरी दाखवू शकत नाही असेही विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

Back to top button