कर्तव्यात कसूर; पवनीचे वनपरिक्षेत्राधिकारी हिरा बारसागडे यांचे निलंबन | पुढारी

कर्तव्यात कसूर; पवनीचे वनपरिक्षेत्राधिकारी हिरा बारसागडे यांचे निलंबन

भंडारा : पुढारी वृत्तसेवा : भंडारा वन विभागांतर्गत येणाऱ्या पवनी क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी हिरा बारसागडे यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या 

पवनी तालुक्यातील खातखेडा येथे २८ जूनला सुधाकर सीताराम कांबळे नावाच्या व्यक्तीवर वाघाने हल्ला करून ठार केले होते. दरम्यान वन परिक्षेत्राधिकारी हिरा बारसागडे कर्तव्यावर नसल्याने गावकऱ्यात आणि वन अधिकारी-कर्मचाऱ्यांत वाद होवून सहाय्यक वनसंरक्षक यशवंत नागुलवार यांना जबर मारहाण झाली होती. यावेळी हिरा बारसागडे हजर नसल्याने वातावरण निवळले मात्र, त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

तसेच अधिनस्थ कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे वागणे, खातखेडा येथील घटना होण्याआधी कर्मचाऱ्यांच्या गस्ती दरम्यान उपस्थित न राहणे यासारख्या अनेक तक्रारी कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या. यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी हिरा बारसागडे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत निलबिंत करण्यात आले. सदरची कारवाई महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमानुसार करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

Back to top button