मुलभूत सुविधाच नाहीत तर नवीन गावात जिवन जगायचे कसे? रानतळोधीवासियांचा ताडोबा व्यवस्थापनाला प्रश्न

मुलभूत सुविधाच नाहीत तर नवीन गावात जिवन जगायचे कसे? रानतळोधीवासियांचा ताडोबा व्यवस्थापनाला प्रश्न
Published on
Updated on
चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : अनेक वर्षांपासून ज्या गावात निवास करून अख्खे आयुष्य गेले तेथून नवीन गावात जायला पाऊले पुढे येत नाही. जायचे झालेच तर त्या गावात संपूर्ण सुविधा असायलाच हव्यात. जेणे करून नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. परंतु त्या ठिकाणी मुलभूत सुविधाच नाही आणि वनप्रशासन पूनर्वसनाच्या नावाने जाण्याचा अट्टाहास धरीत असेल तर नागरिक मात्र वनप्रशासनाला "मुलभूत सुविधाच नाही तर नवीन गावात राहायचे कसे" असा प्रश्न नक्की विचारल्या शिवाय राहणार नाही. ताडोबातील पुनर्वसनाचे शेवटे राहिलेले गाव रानतळोधीवासीयांनी ताडोबा व्यवस्थापनाला हा प्रश्न केला आणि नवीन गावात जायचे थांबले. काही महिन्यातच ताडोबा व्यवस्थापन मुलभूत सुविधा निर्माण करतील आणि जानेवारी 2024 मध्ये ताडोबातील शेवटच्या रानतळोधी वासियांचे पूनर्वसन होईल असा विश्वास ताडोबा व्यवस्थापनाने दिला आहे.
जगात व्याघ्र दर्शनाकरीता प्रसिध्द असलेला चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात देश विदेशी नागरिक पर्यटनाकरीता येतात. पर्यटनासोबतच गावांनाही भेटी देतात. तेथील नागरिकांचे जिवनमानही बघतात. रानतळोधी हे कोअरझोनमधील पुनर्वसनाचे शेवटचे राहिलेले गाव आहे. आतापर्यंत कोअरझोनमधील गावांचे पुनर्वसन झाले आहे. रानतळोधी हे शेवटचे सहावे गाव आहे. या गावाचे पूनर्वसन करून ताडोबा व्यवस्थापन आपले उद्दिष्ट पूर्ण करणार आहे. नुकताच वनप्रशासनाने रानतळोधीवासीयांना नवीन गावात पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी झाला.

ताडोबा व्यवस्थापनाला रानतळोधी गावाचे पुनर्वसन आवश्यक

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोरझोन मधील 180 कुटुंबाचे रानतळोधी हे गाव आहे. अनेक वर्षांपासून ताडोबातील जंगलात त्यांचे वास्तव्य आहे. कोअर झोनमधील शेवटचे गाव असल्याने ताडोबा व्यवस्थापनाला या गावाचे पुनर्वसन आवश्यक आहे. त्या दृष्टीनेच काही वर्षांपासून वरोरा तालुक्यातील वरोरा-चिमूर मार्गांवर सालोरी येथे पुनवर्नवसनाची प्रक्रिया सुरु आहे. गावकरी पूनर्वसनाकरीता तयारही आहेत. 10 कुटूंब  त्या  ठिकाणी गेली आहेत. उर्वरित कुटूंब मात्र त्या ठिकाणी मुलभूत सुविधा निर्माण झाल्यानंतरच जाण्याच्या भूमिकेत आहेत. सुविधा निर्माण न करताच उर्वरित लोकांना पूनर्वसनाच्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न ताडोबा प्रशासन प्रयत्न का? करतो हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे.
तेथील सरपंच काजल मडावी यांच्या म्हणण्यानुसार, गावकऱ्यांच्या मागण्यावर ताडोबा व्यवस्थापनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. पाण्याच्या टाकीचे काम झाले नाही. नाल्याचे काम नाही, शेतात जाण्याकरीता पांदन रस्ते तयार  करण्यात आले नाही. गावातील रस्त्यांचे कामे अर्धवट आहेत. जे लोक गेलेत त्यांना पैसे शुध्दा मिळाले नसल्याचे त्यांचे म्हणने आहे. उपसरपंच यांनी दिलेल्या माहितीनुसार,नागरिकांच्या म्हणण्यानुसार पुनर्वसनाच्या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव आहे.  आतापर्यंत पाच गावांचे पूनर्वसन झाले आहे. आमचे उशिरा पूनर्वसन होत आहे.

नागरी सुविधा नसल्यामुळे पुनर्वसन ठिकाणी जाण्यास विलंब

ज्या गावांचे पूनर्वसन झाले त्या ठिकाणी नागरिकांना मुलभूत सुविधा पाहिजे त्या प्रमाणात मिळाल्यात नाहीत. नवीन शासन निर्णयानुसार, रानतळोधीवासीय सकारात्मक भूमिकेत आहेत. पूर्वी  वन प्रशासनामध्ये काही अधिकाऱ्यांसोबत गावकऱ्यांचे ताडमेड जुळले नाहीत. पण सध्या कार्यरत अधिकाऱ्यांचे सहकार्य चांगले लाभत आहेत. आम्हाला पिढीकरीता या ठिकाणी न राहता पुनर्वसनाच्या ठिकाणी जाणे सोईचे वाटत आहे, परंतु नागरी सुविधांमुळे आम्ही त्या ठिकाणी जाण्यास विलंब करीत आहोत. खास करून उपजिवीकेचे साधन हे शेती आहे. शेती चांगली बनवून दिली नाही तर त्याठिकाणी गेल्यानंतर खायचे काय? असा प्रश्न  गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळेच जुन्याच ठिकाणी आम्ही सर्वांनी शेती केली. नवीन ठिकाणी शेतीला बोअर करून दिले परंतु विद्युत यंत्रणा नाही.
दिवाळी नंतर पिके निघतात त्यांनतर एकएक कुटूंब नवीन ठिकाणी जातील. तोपर्यंत नागरी सुविधा होणे आवश्यक आहेत. आजही त्या ठिकाणी नाल्या नाहीत. यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. दहा घरे मिळून एक बोअर र्करून दिली. त्या बोअरचे पाणी नाल्यामध्ये जात आहे. त्यामुळे सांडपाणी तयार होऊन डासांचे वाढले आहे. त्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. दिवाळीनंतर आम्ही गाव सोडू परंतु त्यापूर्वी प्रशासनाने त्या ठिकाणी नागरिकांना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे. ताडोबा प्रशासन कितीही पुनर्वसनाच्या ठिकाणी सोईसुविधा पूर्ण झाल्याचा कांगावा करीत असले सोईसुविधांचा अभाव असल्यानेच रानतळोधीवासीयांच्या पुनर्वसनला विलंब होत असल्याचे दिसून येत आहे.

तीन महिन्यात सर्व सुविधा पूर्ण होतील : डॉ. जितेंद्र रामगावकर

नवीन पुनर्वसनाच्या ठिकाणी सर्व मूलभूत सुविधांचे काम सुरू आहे. काही कुटुंबे त्या ठिकाणी राहण्यासाठी गेली आहे. शेतीसुधा नवीन ठिकाणी काही नागरिक करीत आहेत. प्रशासनाचा असा प्रयत्न आहे की येणाऱ्या तीन महिन्यांमध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत. त्यामध्ये  इमारती, शाळा, अंगणवाडी, समाज मंदिर, रस्ते, आरोग्य सुविधा निर्माण करून गावाला सर्व इमारतींचे बांधकाम पूर्ण करून सुस्थितीमध्ये हस्तांतरित करून देण्यात येईल. त्यामुळे पुढील चार महिन्यांमध्ये रानतळोधी गावातील नागकिर पुनर्वसनाच्या ठिकाणी वास्तव्याला येतील, असा विश्वास ताडोबा व्याघ्र्‍ प्रकल्पाचे संचालक डॉ. डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी पुढारीशी बोलताना व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news