काही समाजकंटकांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न : अनिल बोंडे | पुढारी

काही समाजकंटकांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न : अनिल बोंडे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : जालना येथील घटनेनंतर संपूर्ण राज्यात मराठा समाजातर्फे निषेध केला जात आहे. दुसरीकडे भाजप खासदार अनिल बोंडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मागील काळात आरक्षणासाठी मराठा समाजाचे 58 मोर्चे निघाले. त्यावेळी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. अतिशय शांततेत मोर्चे निघाले. मात्र त्यावेळी सामनाने मूक मोर्चा म्हणून हेटाळणी केली. जालना येथे काही समाजकंटकांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला गालबोट लावलं. दगडफेक केली त्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला. या लाठीमाराचे समर्थन नाहीच. मात्र, मराठा समाजाला स्वतःच्या राजकारणासाठी काही लोक कलंकित करीत आहेत.

जाळपोळ, मारहाण मराठा समाजाच्या आंदोलनात कधीही घडलं नाही. शिंदे -फडणवीस सरकारला गालबोट लावण्याचा हा प्रयत्न आहे याचा तपास व्हायला पाहिजे अशी प्रतिक्रिया भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी दिली आहे.

Back to top button