नागपूर : ९ वर्षीय चिमुकलीवर अनन्वित अत्याचार, जीव धोक्यात घालून पडली बाहेर ! | पुढारी

नागपूर : ९ वर्षीय चिमुकलीवर अनन्वित अत्याचार, जीव धोक्यात घालून पडली बाहेर !

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : बेसा परिसरात एका ९ वर्षीय चिमुकलीला गेल्या ३ वर्षांपासून एका दाम्पत्याकडून अनन्वित चल, अमानवीय यातना दिल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दाम्पत्याच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने तिच्या या अत्याचाराची कैफियत माध्यमांशी बोलताना व्यक केली. ९ वर्षीय अल्पवयीन मुलगी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून रात्री या प्रकरणी आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

घटनेतील चिमुकलीसोबत ३ वर्षांपासून अमानवीय छळ सुरू होता. बेसा या पॉश परिसरात हा संतापजनक प्रकार घडला. या अल्पवयीन मुलीला घरात कोंडून ठेवले गेले होते. मुलीच्या शरीरावर सिगारेटच्या चटक्यांच्या जखमा असून माणुसकीला काळिमा फासणारी अशीच ही घटना आहे. ६ वर्षाची असताना या चिमुकलीला खान नामक दाम्पत्यांनी नागपुरात घरकामासाठी आणले. मात्र, मागील ३ वर्षांपासून अमानुष यातना दिल्या.

९ दिवसांपासून घरात डांबून ठेवलेली बालिका भुकेने व्याकुळ होती

पोलिसांना मिळालेल्या माहितीप्रमाणे, या मुलीला मागील ९ दिवसांपासून घरात डांबून खान परिवार बाहेर गेले होते. या मुलीला खाण्यासाठी दिलेलं ब्रेड आणि बिस्कीट संपल्यानंतर भुकेने व्याकुळ होऊन ती जिवाच्या आकांताने घराच्या ग्रील मधून बाहेर पडली. ही मुलगी जेवणाच्या शोधात, पायात चप्पल नाही, मळकटलेल्या कपड्याने परिसरातील एका परिचित महिलेला भेटली आणि हळूहळू विश्वासात घेतल्यावर तिने तिच्यावर घडलेला अत्यंत  किळसवाणा प्रकार सांगितला. महिलेने परिसरातील नागरिक आणि काही मुलींसह पोलीस स्टेशन गाठले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता हुडकेश्वर पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार दोषी खान कुटुंबावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांचा शोध  घेण्यास सुरुवात केली.

घटनेतील बालिकेला घराबाहेर पडायची परवानगी नव्हती

परिसरातील नागरिकांच्या मते या ६ वर्षीय अल्पवयीन मुलीला खान परिवाराने बंगळूरवरून खरेदी केले, घरातील कामासाठी नोकर म्हणून या मुलीला ते नागपूरला घेऊन आले होते. मात्र तिला घराबाहेर पडायची परवानगी नव्हती.  फक्त कचरा फेकण्यासाठी म्हणून तिला घराच्या बाहेर जाऊ दिले जात होते. ती बाहेरच्या मुलासोबत खेळू शकत नव्हती. मात्र तिने कामास नकार दिल्यास तिला यातना आणि अमानवीय कृत्यांचा सामना करावा लागत होता. एकंदरीतच या घटनेत आता पोलीस प्रशासन या दोषीं खान कुटुंबियांवर  काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button