नागपूर : वीज कर्मचा-यांना मारहाण; कठोर पोलीस कारवाईसाठी महावितरण आग्रही | पुढारी

नागपूर : वीज कर्मचा-यांना मारहाण; कठोर पोलीस कारवाईसाठी महावितरण आग्रही

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील बिनाकी उपविभाग अंतर्गत वनदेवी नगर भागात फ्यूज कॉलच्या तक्रारीवर असताना, महावितरणच्या कर्मचा-यांवर आणि टॉवर शिडीच्या वाहनावर दगडफेक आणि विटा फेकण्यात होत्या. कर्मचारी थोडक्यात बचावला त्याच दिवशी सकाळी त्याच वनदेवी नगर परिसरात महावितरणच्या दोन कर्मचा-यांना धक्काबुक्की देखील करण्यात आली होती. याचसोबत काटोल ग्रामीण उपविभागातील भिष्णूर येथे थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यास गेलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञ सुभाष घरत यांना देखील घक्काबुक्की झाल्याच्या घटना घडल्या. या दोन्ही प्रकरणात महावितरणतर्फ़े संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भा.दं.वि. चे कलम 353 या कलमान्वये आरोपीला कठोर शिक्षेची तरतूद आहे. या कलमाचा आधार घेत मागील काही दिवसांत झालेल्या हल्ल्यातील घटनांमध्ये महावितरणने हल्लेखोरांविरोधात कठोर भूमिका घेतली असुन त्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी महावितरण पाठपुरावा करीत आहे.

Back to top button