वडेट्टीवार यांना मोठा नेता असल्याचे दाखवावे लागते : बावनकुळे | पुढारी

वडेट्टीवार यांना मोठा नेता असल्याचे दाखवावे लागते : बावनकुळे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आम्हाला कुठल्या सर्व्हेची चिंता नाही, रोज लोकांमध्ये असल्याने त्यांचे समर्थन मोदींना असल्याचे दिसत आहे. आज (दि. २६) काँग्रेस ढासळलेल्या अवस्थेत असून भाजपला जनतेचा वाढता प्रतिसाद पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विजय वडेट्टीवार नवीन नवीन विरोधीपक्ष नेते झाले आहेत. काँग्रेसला वडेट्टीवार यांना मोठा नेता असल्याचे दाखवावे लागते असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (दि. २६) माध्यमांशी बोलताना सोडले.

बावनकुळे म्हणाले, भारत चंद्रावर पोहचला अभिमानाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठबळ दिल्याने आज ही मोहीम यशस्वी झाली. शास्त्रज्ञांचे अभिनंदन करणे ही नैतिकता आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोत गेले. पण विरोधी पक्षाचे नेते यांना ते देखील सहन होत नाही, कारण 65 वर्षात त्यांनी कधी असे केलंच नाही.

भाजप पक्षाचा इतिहास गौरवशाली आहे, आम्हाला जन्मजात काही मिळालं नाही, काँग्रेस बरखास्त करा असे महात्मा गांधी म्हणाले होते.
वडेट्टीवार ईडी, सीबीआयवर असा अविश्वास दाखवणार असतील तर देशात काहीच राहणार नाही. लोक भष्ट्राचार करतील तर वाळू माफिया आणि दारू माफियाच तयार होतील. वडेट्टीवार यांना शरद पवार हे समजले नाहीत असा टोलाही लगावला.

दरम्यान, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याविषयी बोलताना बावनकुळे म्हणाले, अनिल देशमुख सध्या जमानतीवर बाहेर आहेत. त्यांनी ऑर्डर बरोबर वाचलेली दिसत नाही. जमानतीच्या अटीशर्तीचा ते भंग करत आहेत. अनिल देशमुख आमचे मित्र आहेत, मी शरद पवार यांना काहीही बोललो नाही, त्यांच्या भूमिकेवर बोललो, शरद पवार, सुप्रिया सुळे बोलतात, ते म्हणतात फूट पडली नाही. त्यावर बोललो, शरद पवार यांना निर्णय घ्यायचा अधिकार आहे.

भाजपचे घर चलो अभियान, 28 लोकसभा मतदार संघात प्रवास करत असताना आज पाचव्या लोकसभा मतदारसंघात जात आहे. मोदींना लोक मत द्यायला तयार आहेत, मध्यमवर्गीय व्यक्ती मत द्यायला तयार आहे, जनतेच्या मनात काय हे महत्वाचे आहे. मतदार मोदींनाच मतदान करतील असंही बावनकुळे यावेळी म्हणाले.

Back to top button