वर्ल्ड बँकेची प्रतिनिधी लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर; जिल्हा विकास आराखडा समितीची सभा

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : येत्या 29 ऑगस्टला जागतिक बँकेचे प्रतिनिधी राज्याला भेट देणार असून नागपुरातील विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांसोबत हे प्रतिनिधी संवाद साधणार आहेत. यासंदर्भात सर्व आवश्यक माहिती देण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी आज केले. जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी इंग्रजी भाषेमध्ये आपली माहिती भरून पाठवावी व या संदर्भात कोणतीही अडचण असल्यास जिल्ह्याचे नियोजन अधिकारी राजेश गायकवाड यांच्याशी संपर्क सादर याची सूचना यावेळी करण्यात आली. जागतिक बँकेच्या प्रतिनिधी सोबतच्या 29 ऑगस्टच्या बैठकीच्या अनुषंगाने जिल्हा विकास आराखडा जिल्हास्तरीय बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी आपापल्या आस्थापनांची योग्य माहिती सादर करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला 2017 पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे.भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) या उपक्रमात समन्वयकाची भूमिका निभावत असून जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने जिल्ह्याची माहिती संकलित केली जात आहे.